नाना काटे यांच्या हस्ते ग्रंथांचे पूजन
पिंपळे सौदागर, दि. ११ ऑगस्ट २०२५: सालाबादप्रमाणे पिंपळे सौदागर येथील शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने आज तिसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या १३ वर्षांपासून मंडळाच्या वतीने हा उपक्रम घेतला जात असून, यावर्षीही परिसरातील असंख्य महिला आणि शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या सोहळ्याची सुरुवात ग्रंथांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या शुभहस्ते हा विधी पार पडला. यावेळी नाना काटे यांनी पारायण सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे स्वागत केले आणि मनाच्या शांततेसाठी अशा पारमार्थिक कार्यक्रमांचे आयोजन खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
याप्रसंगी शिवशंभो सेवा मंडळाचे संस्थापक ज्ञानेश्वर उर्फ माऊली हांडे, ह.भ.प. विलास काटे, शिवशंभो सेवा मंडळाचे अध्यक्ष अनिल मुरलीधर काटे, नंदकुमार काटे, चंद्रकांत सुलाब काटे, राजू टकले, जयसिंग चव्हाण यांच्यासह परिसरातील माता-भगिनी आणि शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Pimple Saudagar, Shivshambho Seva Mandal, Shivlilamrut Parayan, Religious Event, Shravani Somvar.
#PimpleSaudagar #Shivlilamrut #Parayan #ShravaniSomvar #ReligiousEvent #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: