उरण, (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी काँग्रेसचे कट्टर आणि प्रामाणिक कार्यकर्ते मिलिंद पाडगावकर आणि श्रद्धा ठाकूर यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते मुंबईतील टिळक भवन येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मिलिंद पाडगावकर आणि श्रद्धा ठाकूर यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Milind Padgaonkar
Shraddha Thakur
Maharashtra Congress
General Secretary
Tilak Bhavan
#MilindPadgaonkar #ShraddhaThakur #MaharashtraCongress #Congress #MaharashtraPolitics #TilakBhavan

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: