उरण, (प्रतिनिधी): कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य आणि कला महाविद्यालयात ७ ऑगस्ट २०२५ रोजी एकदिवसीय 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (Artificial Intelligence) विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ही कार्यशाळा पार पडली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांनी यावेळी बोलताना, "विद्यार्थी आणि शिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरून न जाता ती आत्मसात करावी आणि तिचा योग्य वापर करता आला पाहिजे," असे विचार मांडले.
कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता डिझायनर प्रदीप कश्यप यांनी 'कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे' आणि 'हे कौशल्य पारंपरिक शिक्षणासोबत कसे आत्मसात करावे' याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, योग्य प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी आपले करिअर कसे घडवू शकतात, याविषयीही त्यांनी माहिती दिली. शिक्षकांनी शिकवताना आणि संशोधन करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर कसा करावा, यावरही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला प्राचार्य प्रा. डॉ. वाल्मीक गर्जे, प्रा. डॉ. एम. जी. लोणे, प्रा. डॉ. पराग कारुळकर आणि अंतर्गत गुणवत्ता हमी सेलचे प्रमुख प्रा. डॉ. अरुण चव्हाण यांच्यासह अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचा समारोप प्रा. हन्नत शेख यांनी आभार प्रदर्शनाने केला.
Uran College
Artificial Intelligence Workshop
Kokan Gyanpeeth
Pradeep Kashyap
Dr. Valmik Garje
#UranCollege #AIWorkshop #ArtificialIntelligence #Education #KokanGyanpeeth #CareerGuidance #Technology

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: