हर्षवर्धन सपकाळ आणि महेंद्र घरत यांच्या हस्ते सत्कार
उरण, (प्रतिनिधी): पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (इंटक) संलग्नच्या सेंट्रल एक्झिक्युटिव्ह बोर्डच्या बैठकीत भारत पेट्रोलियम युनिटचे जनरल सेक्रेटरी किरीट पाटील यांची सर्वानुमते सेक्रेटरी जनरल पदी निवड करण्यात आली आहे. या युनियनमध्ये एचपीसीएल, बीपीसीएल, व्हिडॉल, रिलायन्स, टाईटवॉटर, लुब्रीझॉल, महानगर गॅस आणि ओएनजीसी यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ५) मुंबईतील टिळक भवन येथे किरीट पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
अभ्यासू आणि दांडगा जनसंपर्क असलेले किरीट पाटील हे गेली ३५ वर्षे बीपीसीएलमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी उरणच्या युनिट सेक्रेटरी पदावर आणि नंतर डेप्युटी जनरल सेक्रेटरी पदावर काम केले आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वीच त्यांची जनरल सेक्रेटरी म्हणून निवड झाली होती. त्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन आता त्यांची सेक्रेटरी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीनंतर किरीट पाटील यांनी आपले गुरुवर्य महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनामुळेच आत्मसन्मानाने जगत असल्याचे आणि विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मुंबईतील तेल रसायन भवन येथे महेंद्र घरत यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर आणि वैभव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. किरीट पाटील हे एनएमजीकेएस संघटनेच्या उपाध्यक्षपदी आणि इंटक रायगड जिल्हाध्यक्ष तसेच रायगड काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदीही कार्यरत आहेत.
Kirit Patil
Petroleum Employees Union
Secretary General Appointment
INTUC
Trade Union Leader
#KiritPatil #PetroleumEmployeesUnion #INTUC #TradeUnion #MaharashtraPolitics #Uran #MahendraGharat

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: