कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानचा अभिनंदनीय सामाजिक उपक्रम
दापोली, (प्रतिनिधी): भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, दापोलीतून "एक राखी जवानांसाठी; देशाच्या रक्षकांसाठी" या अभियानांतर्गत मोठ्या संख्येने राख्या सीमेवर कार्यरत असलेल्या जवानांसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या 'युवा प्रेरणा कट्टा' टीमने हा उपक्रम आयोजित केला होता.
यावर्षीच्या अभियानाचा मुख्य उद्देश 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवणाऱ्या भारतीय सैन्यदलाप्रती आदर व्यक्त करणे हा होता. दापोलीतील विविध शाळा, महाविद्यालये आणि काही सामान्य महिलांनी या उपक्रमात सहभागी होऊन राख्या जमा केल्या.
या उपक्रमाबाबत बोलताना मिहीर महाजन म्हणाले की, "भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा २०२२ मध्ये आम्ही या उपक्रमाची सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी हा उपक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो." यावर्षी जमा झालेल्या राख्या पठाणकोट (पंजाब) येथील भारतीय वायुसेनेच्या हवाई तळावरील जवानांना तसेच मुंबई येथील सशस्त्र सेना सामान चिकित्सा डेपोमधील कार्यालयातही पाठवण्यात आल्या आहेत.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद पांगारकर, नचिकेत बेहरे, संदीप गरंडे, श्रीप्रीती वैद्य, साक्षी करमरकर, सुमेध करमरकर आणि रोहन भावे यांच्यासह युवा टीमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
Rakhi for Soldiers
Dapoli Event
Indian Army
Social Initiative
#RakhiForSoldiers #Dapoli #IndianArmy #IndianAirForce #CommunityService #RakshaBandhan #SocialInitiative

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: