प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्वागत; गणेश नाईक, हंसराज अहीर यांची उपस्थिती
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेशयेत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरेल - गणेश नाईक
मुंबई, (प्रतिनिधी): कल्याण-डोंबिवली, चंद्रपूर आणि पालघर जिल्ह्यातील काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (उबाठा) अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे भाजप प्रदेश कार्यालयात स्वागत केले.
कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसचे ७ माजी नगरसेवक, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावतीचे उबाठा गटाचे ९ माजी नगरसेवक आणि नगराध्यक्ष अनिल धानोरकर तसेच पालघर जिल्ह्यातील उबाठा नेते उपेंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्वांनी पक्षात प्रवेश केला आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते हंसराज अहीर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
BJP
Maharashtra Politics
Party Joining
Kalyan-Dombivli
Chandrapur
#BJP #MaharashtraPolitics #RavindraChavan #PartyJoining #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: