महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी
मोकळ्या जागेत तात्पुरते स्थलांतर करण्याची सूचनापुणे पेठ, संगमवाडी येथील वसाहतीतील इमारतींची दुरवस्था
पुणे, (प्रतिनिधी): पुणे पेठ येथील संगमवाडी टीपी स्कीममधील फायनल प्लॉट क्रमांक ५३ येथील पुणे महानगरपालिकेची वसाहत धोकादायक झाली असल्याने येथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी २० ऑगस्ट रोजी या वसाहतीची पाहणी करून याबाबत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.
या वसाहतीत एकूण ३६०६०.९६ चौरस फूट जागेतील ९ इमारतींमध्ये २२८ सदनिका आहेत. या सर्व इमारती जुन्या आणि धोकादायक झाल्या असून, त्यांतील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी २३ एप्रिल २०२४ रोजी या संदर्भात सूचना देण्यात आली होती.
आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः या जागेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिरिक्त आयुक्त (बांधकाम विकास विभाग) आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. रहिवाशांना धोकादायक इमारतींमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत त्यांनी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
PMC
Pune
PMC Colony
Building Relocation
Naval Kishore Ram
#PMC #Pune #BuildingRelocation #PuneMunicipalCorporation #DangerousBuilding

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: