पावसामुळे जुन्या नाशकात त्र्यंबक नाक्याजवळ घडली घटना
स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य
धोकादायक वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी स्थलांतरित व्हावे, महापालिकेचे आवाहन
नाशिक, (प्रतिनिधी): जुन्या नाशकात मुसळधार पावसामुळे काल रात्री एक जुना तीन मजली वाडा कोसळल्याने नऊ जण जखमी झाले आहेत. यामध्ये आठ महिलांचा समावेश आहे. या सर्वांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जुने नाशिक गावठाण परिसरात मोठ्या संख्येने जुने आणि जीर्ण वाडे आहेत. त्र्यंबक नाका पोलीस चौकीजवळ असलेला हा तीन मजली वाडा कोसळल्यानंतर स्थानिक नागरिक आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ बचावकार्य सुरू केले. सर्वांना सुखरूप बाहेर काढून तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले.
जुन्या नाशकातील अनेक जुने वाडे सध्या धोकादायक स्थितीत असल्याने नागरिकांनी तातडीने स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Nashik
Building Collapse
Old City
Rain
Injuries
#Nashik #BuildingCollapse #Monsoon #Rain #OldNashik #Maharashtra
पावसामुळे जुना वाडा कोसळला; नऊ जण जखमी, आठ महिलांचा समावेश
Reviewed by ANN news network
on
८/२१/२०२५ ०५:२८:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: