मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
पुणे येथे राज्यपाल तर विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
मंत्री गैरहजर असल्यास जिल्हाधिकारी करणार ध्वजारोहण
मुंबई: भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा होणार असून, राज्याचा मुख्य शासकीय सोहळा मुंबईतील मंत्रालयात होणार आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येईल. तसेच, पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
राज्याच्या मुख्य शासकीय सोहळ्यानंतर प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करणाऱ्या मान्यवरांची यादी राजशिष्टाचार विभागाने जाहीर केली आहे. यानुसार, विविध जिल्ह्यांमध्ये संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
जिल्हा मुख्यालयातील मान्यवरांची यादी:
ठाणे: एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
बीड: अजित आशाताई अनंतराव पवार
नागपूर: चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
अहिल्यानगर: राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील
गोंदिया: छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ
सांगली: चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
नाशिक: गिरीश गीता दत्तात्रय महाजन
पालघर: गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
जळगाव: गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
अमरावती: दादाजी रेशमाबाई दगडू भुसे
यवतमाळ: संजय प्रमिला दुलिचंद राठोड
रत्नागिरी: उदय स्वरुपा रवींद्र सामंत
धुळे: जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
जालना: श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
नांदेड: अतुल लिलावती मोरेश्वर सावे
चंद्रपूर: डॉ. अशोक जनाबाई रामाजी वुईके
सातारा: शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई
मुंबई उपनगर: ॲड. आशिष मिनल बाबाजी शेलार
वाशिम: दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
रायगड: कु. आदिती वरदा सुनिल तटकरे
लातूर: शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
नंदुरबार: ॲड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे
सोलापूर: जयकुमार कमल भगवानराव गोरे
हिंगोली: नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
भंडारा: संजय सुशिला वामन सावकारे
छत्रपती संभाजीनगर: संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
धाराशिव: प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
बुलढाणा: मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग: नितेश निलम नारायण राणे
अकोला: आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
कोल्हापूर: प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर
गडचिरोली: ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
वर्धा: डॉ. पंकज कांचन राजेश भोयर
परभणी: श्रीमती मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर
जर निश्चित झालेले पालकमंत्री काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू शकले नाहीत, तर विभागीय मुख्यालयात विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, असेही राजशिष्टाचार विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच, कोकण भवन येथील ध्वजारोहण विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात येईल.
Independence Day, Maharashtra, Government, Politics, Flag Hoisting
#IndependenceDay #Maharashtra #FlagHoisting #Mumbai #Pune #DevendraFadnavis #IndianIndependence

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: