गुप्त माहितीच्या आधारे गंजपेठेतून आरोपीला केले जेरबंद
पुणे
(प्रतिनिधी) - पुणे गुन्हे शाखा
युनिट-१ ने
खुनाच्या प्रयत्नातील सुमारे एक महिन्यापासून फरार
असलेल्या 'बाबा' नावाच्या आरोपीला (साजिद
उर्फ बाबा नझीर
लाला खान) अटक
केली आहे. शिवाजीनगर रेल्वे
स्टेशनजवळ घडलेल्या गंभीर गुन्ह्यात तो
हवा होता.
दिनांक
२ जुलै, २०२५
रोजी शिवाजीनगर रेल्वे
स्टेशनजवळील सार्वजनिक शौचालयात एका अल्पवयीन मुलावर
गौरव गणेश तेलंगी,
आलोक सचिन अलगुडे
आणि 'बाबा' यांनी
जुन्या भांडणाच्या रागातून धारदार
शस्त्राने हल्ला करून त्याला
गंभीर जखमी केले
होते. यात पीडिताच्या डोक्यावर, पाठीवर
वार करण्यात आले
होते, तसेच डाव्या
हाताचा पंजा मनगटापासून वेगळा
करून त्याला जीवे
ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला
होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस
ठाण्यात भारतीय न्याय संहिता
कलम १०९, ३
(५), आर्म ॲक्ट
क. ४/२५,
आणि महाराष्ट्र पोलीस
ॲक्ट ३७ (१),
(३) सह १३५
अन्वये गुन्हा दाखल
करण्यात आला होता.
या
गंभीर गुन्ह्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी गौरव
गणेश तेलंगी आणि
आलोक सचिन अलगुडे
यांना यापूर्वीच अटक
केली होती. मात्र,
'बाबा' फरार होता.
युनिट-१ चे
पोलीस अधिकारी आणि
अंमलदार 'बाबा'चा शोध
घेत असताना, पोलीस
अंमलदार हेमंत पेरणे यांना
बातमीदाराकडून
खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार, साजिद
उर्फ बाबा नझीर
लाला खान हा
८ ऑगस्ट, २०२५
रोजी रात्री त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी अंगारशहा तकीया,
गंजपेठ, पुणे येथे
येणार असून, त्याने
लाल रंगाचा पठाणी
ड्रेस घातलेला आहे,
अशी माहिती मिळाली.
या
माहितीच्या आधारे युनिट-१
च्या पोलीस पथकाने
अंगारशहा तकीया, गंजपेठ येथे
सापळा रचला आणि
साजिद उर्फ बाबा
नझीर लाला खान
(वय २३, रा.
बिबवेवाडी) याला ताब्यात घेतले.
विश्वासात घेऊन अधिक चौकशी
केली असता, त्याने
आपल्या साथीदारांच्या मदतीने
गुन्हा केल्याची कबुली
दिली. त्यानंतर त्याला
पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस
ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही
कामगिरी अपर पोलीस आयुक्त
(गुन्हे) पंकज देशमुख,
पोलीस उप-आयुक्त
(गुन्हे) निखील पिंगळे
आणि सहायक पोलीस
आयुक्त (गुन्हे-२)
राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ
पोलीस निरीक्षक (युनिट-१ गुन्हे शाखा)
कुमार घाडगे, सहायक
पोलीस निरीक्षक बर्गे,
आणि पोलीस अंमलदार विनोद
शिंदे, विठ्ठल साळुंखे, मयुर
भोसले, अमित जमदाडे,
हेमंत पेरणे, निलेश
साबळे व उमेश
मठपती यांच्या पथकाने
केली.
Crime News, Pune Police, Attempted Murder, Arrest
#PunePolice #CrimeBranch #AttemptedMurder #Arrest #ShivajiNagar #Pune #MaharashtraPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: