१९९६ पासून नाशिकमध्ये नगरसेविका असलेल्या डॉ. पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला
मध्य नाशिकची जागा शिवसेनेला सोडल्याने व्यक्त केली होती नाराजी
१५ वर्षे प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेश प्रवक्ता म्हणून केले होते काम
नाशिक, (प्रतिनिधी): काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी प्रदेश सरचिटणीस डॉ. हेमलता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडल्यामुळे नाराज होऊन त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
डॉ. हेमलता पाटील यांनी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्षात काम केले आहे. त्या १९९६ पासून नाशिक महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून, विरोधी पक्ष नेतेपदासह विविध पदे त्यांनी भूषविली आहेत.
Hemlata Patil
NCP
Congress
Nashik
Political Entry
#HemlataPatil #NCP #Congress #Nashik #MaharashtraPolitics
नाशिक काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. हेमलता पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Reviewed by ANN news network
on
८/२०/२०२५ ०८:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: