बरेलीमध्ये ‘उत्तर प्रदेश विधि विरुद्ध धर्म संपरिवर्तन अधिनियम’ अंतर्गत पहिली शिक्षा
आरोपी तौफीकला २९ हजार रुपयांचा दंड; अर्धी रक्कम पीडितेला देण्याचा न्यायालयाचा आदेश
अवघ्या साडेसहा महिन्यांत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन निकाल
बरेली : उत्तर प्रदेशात ‘विधि विरुद्ध धर्म संपरिवर्तन अधिनियम’ (अवैध धर्म परिवर्तन विरोधी कायदा) अंतर्गत पहिला निकाल जाहीर झाला आहे. एका चर्चित प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी तौफीकला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला २९ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, त्यातील अर्धी रक्कम पीडित तरुणीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
२० ऑक्टोबर २०२४ रोजी सिरौली पोलीस ठाण्यात एका तरुणीने तक्रार दाखल केली होती. तिने आरोप केला होता की, तौफीकने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्याचा दबाव टाकला आणि तिचे नाव बदलून ‘शबनम’ ठेवले. तो तिला सतत त्रास देत होता आणि तिच्या एका सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
या प्रकरणी पोलिसांनी नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अवघ्या साडेसहा महिन्यांत या खटल्याची सुनावणी पूर्ण करून जिल्हा न्यायाधीशांनी निकाल दिला.
Uttar Pradesh
Anti-Conversion Law
Bareilly
Legal Judgement
Imprisonment
#UttarPradesh #AntiConversionLaw #Bareilly #LegalVerdict #Justice #Crime

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: