राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत कारवाई आत्मसमर्पण केलेल्यांना ५० हजार रुपयांची मदत
५५ लाखांचे इनाम असलेल्या नक्षलवाद्यांनी टाकली शस्त्रे
छत्तीसगड :छत्तीसगडमधील दांतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांमध्ये १० महिला नक्षलवाद्यांसह एकूण २९ नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केले आहे. या नक्षलवाद्यांवर सुमारे ५५ लाख रुपयांचे इनाम होते. राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार, आत्मसमर्पण केलेल्या प्रत्येक नक्षलवाद्याला प्रोत्साहन निधी म्हणून ५० हजार रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय, सरकार त्यांना कौशल्य विकास आणि शेतीचे प्रशिक्षणही देणार आहे.
Naxalite Surrender
Chhattisgarh
Law Enforcement
Rehabilitation
Public Safety
#Naxalites #Chhattisgarh #Surrender #LawEnforcement #Rehabilitation #PublicSafety
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: