पुणे (प्रतिनिधी) - सिंहगड
रोड पोलिसांनी (Sinhgad Road Police) एका वृद्ध
महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळून
गेलेल्या दोन आरोपींना अटक
केली आहे. त्यांच्याकडून
चोरीची सोन्याची साखळी
आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी
असा एकूण ९०
हजार रुपयांचा ऐवज
जप्त करण्यात आला
आहे.
सिंहगड रोड
पोलीस ठाण्यात ४ ऑगस्ट, २०२५
रोजी एका वृद्ध
महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला
होता. दोन अनोळखी
इसमांनी रात्रीच्या वेळी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन
जबरदस्तीने हिसकावून चोरली होती. या गुन्ह्याचा तपास
करत असताना, पोलीस
अंमलदार आण्णा केकाण, तानाजी
सागर आणि निलेश
भोरडे यांना त्यांच्या खास
बातमीदाराकडून
माहिती मिळाली.
बातमीनुसार, नऱ्हे
येथील झील कॉलेज
चौकासमोर दोन दिवसांपूर्वी एका
वृद्ध महिलेची सोन्याची साखळी
चोरी झाली होती.
हे आरोपी
राममंदिराजवळ, अंबाईदरा, धायरी येथे थांबले
असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे
तपास पथकाचे प्रभारी अधिकारी, पोलीस
उपनिरीक्षक संतोष भांडवलकर , यांनी वरिष्ठांना कळवून
त्यांच्या आदेशानुसार पथकासह घटनास्थळी धाव
घेतली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन
खात्री केली असता,
बातमीतील वर्णनानुसार दोन इसम थांबलेले दिसले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन
त्यांची चौकशी केली असता
त्यांनी त्यांची नावे राहुलकुमार शामकुमार (वय
३३) आणि गोविंदा कुमार
ओमप्रकाश (वय ३५) अशी सांगितली. पोलिसांनी कसून तपास केला
असता, त्यांनीच गुन्हा
केल्याचे निष्पन्न झाले.
या आरोपींकडून चोरी केलेली ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि ३० हजार रुपये किमतीची होंडा शाईन (MH 12 TM 4657) ही मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
Crime, Pune Police, Chain Snatching
#PunePolice #SinhgadRoadPolice #CrimeNews #ChainSnatching #Pune #Maharashtra #PoliceAction

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: