'अरुण गवळीचा पीए' असल्याची बतावणी करून ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना लष्कर पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ ने संयुक्त कारवाई करून अटक केली आहे. आरोपींनी 'अरुण गवळीचा पीए बोलतोय' अशी बतावणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
याप्रकरणी लष्कर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार बांधकाम व्यावसायिक त्यांच्या कार्यालयात असताना आरोपींनी त्यांना वारंवार धमकावले. रोहन गवारे आणि त्याच्या साथीदारांच्या सांगण्यावरून सुदर्शन गायके याने स्वतःला 'अरुण गवळीचा पीए' असल्याचे सांगून संगनमताने ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार व्यावसायिकाने पोलिसांकडे दाखल केली होती.
या गुन्ह्याचा तपास करताना खंडणी विरोधी पथक-१ आणि लष्कर पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी रोहन शिवाजी गवारे (वय ३०), सुदर्शन आसमानराव गायके (वय २७), महेंद्र रामनाथ शेळके (वय ४२) आणि कृष्णा परमेश्वर बुधनर (वय २६) यांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीही जप्त केली आहे.
ही कारवाई पुणे शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Crime, Pune, Police, Extortion, Arrest, Gangster, Lashkar Police Station
#PunePolice #Extortion #CrimeNews #Arrest #LashkarPolice #PuneCity #CrimeBranch #MaharashtraPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: