पुणे : पुणे शहरातील बंडगार्डन पोलिसांनी हरवलेले ५० मोबाईल फोन हस्तगत करून ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. या मोबाईल फोनची एकूण किंमत ५ लाख ९१ हजार रुपये आहे.
बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. त्यांनी हरवलेल्या मोबाईल फोनचा डेटा तयार करून, तांत्रिक तपास आणि पाठपुराव्याच्या आधारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हे फोन मिळवले.
पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते यांच्या हस्ते बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये संबंधित तक्रारदारांना हे मोबाईल फोन परत करण्यात आले. फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
Pune Police
Mobile Phones
Cyber Crime
Bundgarden Police
Lost and Found
#PunePolice #MobileRecovery #BundgardenPolice #CyberCrime #LostandFound #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: