बाणेर: पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत, बाणेर पोलिसांनी दोन आरोपींना ३ किलो ४०० ग्रॅम गांजासह अटक केली आहे. ही कारवाई २१ ऑगस्ट २०२५ रोजी जुपिटर हॉस्पिटलसमोर, बाणेर येथे करण्यात आली.
पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाली की, काही व्यक्ती गांजा विक्रीसाठी बाणेर परिसरात फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि रवी विजय वर्मा (वय १९) आणि कौशलेन्द्र नथुप्रसाद वर्मा (वय २३) या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Police
Drug Bust
Ganja
Arrest
Baner Police
#PunePolice #DrugBust #Ganja #Arrest #Baner #CrimeNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: