वसई-विरार मधील ‘बविआ’च्या अनेक नगरसेवक, कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

 


माजी नगरसेवक महेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल 

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा 

वसई-विरार: वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीचे (बविआ) अनेक वर्षांपासून नगरसेवक असलेले महेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. या प्रवेशामुळे वसई-विरारमधील भाजपाची ताकद वाढली असून, आगामी काळात या परिसराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असे आश्वासन रविंद्र चव्हाण यांनी दिले.

मंगळवारी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा पंडित दुबे, आमदार प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, वसई-विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, "विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या ध्येयासाठी समर्पित मोदी सरकार आणि महायुती सरकारवर विश्वास ठेवून या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे." ते पुढे म्हणाले की, "आम्ही या सर्वांचा विश्वास सार्थ ठरवू. वसई-विरार परिसराच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिसरातील नागरी प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष देत आहेत." या परिसरातील समस्या दूर करून सर्वांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या प्रवेशामुळे वसई-विरार, नालासोपारा परिसरातील नागरिकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यकर्ते भाजपाशी जोडले गेल्याने आता नागरिकांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवले जातील, असे चव्हाण यांनी नमूद केले. भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष राजेश ठाकूर, महिला झोपडपट्टी आघाडीच्या अध्यक्ष सविता ठाकूर, रवी पाटील, राजेश पाटील, दिलीप भोईर, हर्ष म्हात्रे आणि युवा प्रतिष्ठानचे धवल चोरघे यांचाही समावेश आहे.

Politics, BJP, Bahujan Vikas Aghadi, Vasai-Virar, Party Switch 

 #BJP #VasaiVirar #Politics #Maharashtra #PartySwitch #RaviChavan #DevendraFadnavis

वसई-विरार मधील ‘बविआ’च्या अनेक नगरसेवक, कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश वसई-विरार मधील ‘बविआ’च्या अनेक नगरसेवक, कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश Reviewed by ANN news network on ८/१२/२०२५ ०३:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".