सचिन साठे सोशल फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
पिंपळे निलख, (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचा जो संकल्प केला आहे, त्याचे भविष्य आजचे विद्यार्थी आहेत, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले. पिंपळे निलख येथील सचिन साठे सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. या उपक्रमाचे हे २१ वे वर्ष होते.
या कार्यक्रमात भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि माजी आमदार अश्विनी जगताप उपस्थित होते. यावेळी शत्रुघ्न काटे म्हणाले की, 'विद्यार्थ्यांनी चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर हे यश संपादन केलेले आहे. त्यासाठी काटेकोर मेहनत आणि वेळेचे नियोजन ही यशाची गुरुकिल्ली आहे.'
सचिन साठे म्हणाले की, 'दहावी आणि बारावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करून इतरांना प्रेरणा देणे हा या सोहळ्याचा उद्देश आहे.'
या कार्यक्रमात दहावी आणि बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या वरद मनीष गुप्ता आणि अवनी सचिन गुंड यांना स्व. आमदार लक्ष्मण जगताप स्मृती पुरस्कार आणि स्व. सुरज काळूराम नांदगुडे स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच ८५% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच, सन्मानचिन्ह आणि स्कूल बॅग प्रदान करण्यात आल्या.
Sachin Sathe Social Foundation
Shankar Jagtap
Students Felicitation
Pimple Nilakh
Education Awards
#SachinSatheFoundation #ShankarJagtap #StudentFelicitation #PimpriChinchwad #Education #Awards

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: