२० केव्ही क्षमतेच्या प्रकल्पाचा शुभारंभ; वर्षाकाठी तीन लाखांहून अधिक रुपयांची वीज बचत होणार
वाकड, (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर वाकड येथील यशवन सेंट्रल, बिल्डिंग सी विंग सहकारी गृहनिर्माण संस्थेत २० केव्ही क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. हा पर्यावरणपूरक उपक्रम शाश्वत आणि हरित भविष्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
यावेळी बोलताना राहुल कलाटे यांनी सोसायटीच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले, "हा उपक्रम केवळ ऊर्जा बचतीच नव्हे, तर शाश्वत विकासाच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल आहे. यशवन सेंट्रलच्या रहिवाशांनी आणि समिती सदस्यांनी दाखवलेली कटिबद्धता इतरांसाठी आदर्शवत आहे."
या समारंभाला सी विंगचे चेअरमन धीरज महाजन, सचिव प्रतीक खंडार, समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते. रहिवाशांनी राहुल कलाटे यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या सौरऊर्जा प्रकल्पामुळे दर महिन्याला २५ हजार आणि वर्षाला तीन लाखांहून अधिक रुपयांची वीज बचत होणार आहे. यासोबतच कार्बन उत्सर्जनामध्येही घट होईल. या उर्जेचा वापर सोसायटीच्या कॉमन एरिया, स्ट्रीट लाईट, लिफ्ट आणि इतर कामांसाठी केला जाईल. हा उपक्रम इतर गृहनिर्माण संस्थांनाही असेच पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याची प्रेरणा देईल.
Yashwan Central Society
Solar Power Project
Rahul Kalate
Wakad
Renewable Energy
#SolarEnergy #YashwanCentral #Pune #Wakad #RenewableEnergy #IndependenceDay #GreenFuture

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: