गेल्या ११ जुलै २०२५ रोजी दुपारी आंबेगाव पठार येथील साईसिद्धी चौकातील वैष्णवी बिल्डिंग परिसरात एचडीएफसी एटीएमसमोर ही घटना घडली. एम.डी.टी. डिव्हाइसवरील कॉलद्वारे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
जखमी अवस्थेत सापडलेल्या युवकाला तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. मृत युवकाची ओळख पटवली असता तो आर्यन उर्फ निखिल अशोक सावळे (वय १९ वर्षे, रा. मु.पो. ठेंगोडा, सटाणा, जि. नाशिक) असल्याचे निष्पन्न झाले.
जलद कारवाईमुळे आरोपी जेरबंद
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. आंबेगाव पठार येथील चिंतामणी शाळेसमोरून पळून जात असताना धैर्यशील उर्फ सचिन बळीराम मोरे (वय २३ वर्षे, रा. सुवर्णयुग नगर, तीन बत्ती चौक, आंबेगाव पठार) हा पोलिसांच्या हाती सापडला.
पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर केले. चौकशीत आरोपी धैर्यशील मोरे याने कबूल केले की, मृत आर्यन सावळे याने त्याला कानशिलात मारल्याच्या रागातून त्याने लोखंडी हत्याराने वार करून खून केला.
कायदेशीर कार्यवाही
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नंबर ३३३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
या गुन्ह्याचा उलगडा करण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक स्वप्निल पाटील, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रमेश चौधरी यांसह मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, नागेश पिसाळ आणि मिलींद गायकवाड यांच्या तपास पथकाची भूमिका महत्त्वाची आहे.
Crime, Murder, Pune Police, Investigation, Arrest, Bharati Vidyapeeth, Ambegaon Pathan
#PuneMurder #CrimeNews #PoliceAction #BharatiVidyapeeth #AmbegaonPathan #Maharashtra #Investigation #Arrest #JusticeServed #PunePolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: