फ़्लिपकार्टने नष्ट करण्यासाठी दिलेला टाकाऊ माल खुल्या बाजारात विकणाऱ्या 'इकोस्टार रिसायकलिंग'चा पर्दाफाश; दोघे अटकेत
ठाणे : ठाणे शहर गुन्हे शाखेने एका मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करत, 'फ्लिपकार्ट' कंपनीकडून नाश करण्यासाठी आलेल्या कालबाह्य (Expiry Date) अन्नधान्य, कडधान्य, खाद्यपदार्थ, कॉस्मेटिक आणि सॅनिटरी उत्पादनांचा नाश न करता, त्याची पॅकिंग बदलून खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या 'इकोस्टार रिसायकलिंग' कंपनीवर छापा टाकला आहे. या कारवाईत सुमारे ३० लाख रुपये किमतीचा १२ टन माल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
९ जुलै २०२५ रोजी गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, दहिसर नाका, शिळ-डायघर, ठाणे येथील "इको स्टार रिसायकलिंग" या कंपनीत फ्लिपकार्टकडून आलेला कालबाह्य कडधान्ये, डाळी, आटा, ड्रायफ्रुट्स, साखर, चॉकलेट, कॉस्मेटिक आणि सॅनिटरी उत्पादने नाश न करता बेकायदेशीररित्या खुल्या बाजारात विकली जात आहेत.
या माहितीच्या आधारे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस अधिकारी, अंमलदार आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत 'इको स्टार रिसायकलिंग अँड इ-वेस्ट रिसायकलिंग कंपनी'च्या दोन गोदामांवर छापे टाकले. ही गोदामे आरिफ कंपाऊंड, गोडाऊन नं. ६, बँक बडोदा जवळ, जुना मुंब्रा पुणे रोड, दहिसर नाका, ठाणे (५३,००० चौ. फूट) आणि गरीब नवाज इस्टेट, फॅक्टरी नं. ६४२, सर्वे नं. ८, हिस्सा नंबर २/ए, पनवेल रोड, दहिसर, ठाणे (३१,००० चौ. फूट) येथे आहेत.
९
जुलै २०२५ रोजी
रात्री ११:३५
वाजेपासून ते १०
जुलै २०२५ रोजी
दुपारी १२:००
वाजेपर्यंत सलग दोन्ही
गोदामांमध्ये तपासणी केली असता,
फ्लिपकार्ट कंपनीकडून नाश करण्यासाठी
पाठवलेले अंदाजे २०० टन
कालबाह्य अन्नधान्य, कडधान्य, विविध
कंपन्यांचा आटा (पीठ),
साखर, तांदूळ, सर्व
प्रकारचे ड्रायफ्रुट्स, टॉयलेट क्लिनर, सॅनिटरी
पॅड, वॉशिंग पावडर,
साबण असा माल
नाश न करता
आढळला.
याबाबत पुढील तपास गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे करत आहे.
Crime, Thane News, Police Action, Fraud
#ThanePolice #CrimeNews #FlipkartScam #ExpiredProducts #EcoStarRecycling #ThaneCrimeBranch #FraudstersArrested #MaharashtraPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: