अहिल्यानगर, दि. २५ जुलै २०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन 'सातबारा कोरा' करण्याचे जाहीरनाम्यात व भाषणांमधून दिलेले आश्वासन पूर्ण करावे, या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रात 'चक्काजाम' (रस्ता रोको) आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार, आज अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील दौंड महामार्गावर, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाट्यावर शेतकऱ्यांच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांचा रस्त्यावर उतरून आक्रोश
या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपला आक्रोश प्रकट केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आणि सातबारा कोरा करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता व्हावी यासाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी यापूर्वी आमरण उपोषण आणि शेतकरी यात्रा काढून जनजागृती केली होती.
आजच्या चक्काजाम आंदोलनात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधून घेतले. रस्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
Maharashtra, Farmer Protest, Bachchu Kadu, Devendra Fadnavis, Loan Waiver, Chakka Jam, Road Blockade, Ahilyanagar, Shrigonda, Farmer Issues
#शेतकरीआंदोलन #कर्जमाफी #बच्चूकडू #चक्काजाम #देवेंद्रफडणवीस #महाराष्ट्र #शेतकरी #सातबाराकोरा #Shrigonda #Ahilyanagar

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: