पुणे, २९ जुलै: पुणे शहर पोलीस दलाच्या नांदेड सिटी पोलीस ठाण्याने एक कौशल्यपूर्ण कामगिरी करत, खुनाचा एक गंभीर गुन्हा अवघ्या दोन तासांत उघडकीस आणला आहे. धायरी येथील एका व्यक्तीचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर, पोलिसांनी तात्काळ तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस
अंमलदार शिवा क्षीरसागर हे
पोलीस स्टेशन हद्दीत
पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय
बातमीदारामार्फत
माहिती मिळाली की,
स.नं. ३०/१३, साई
धाम, त्रिनेश इंजिनिअरींग कंपनीच्या वर,
पहिला मजला, प्रभात
प्रेस रोड, धायरी,
पुणे येथे एक
इसम जखमी अवस्थेत पडलेला
आहे. पोलीस अंमलदार क्षीरसागर यांनी
लागलीच घटनास्थळी जाऊन
खात्री केली असता,
देवा उर्फ देविदास पालते
(वय २५, रा.
धायरी, मूळगाव तागयाल,
ता. मुखेड, जि.
नांदेड) हा गंभीर
जखमी अवस्थेत मिळून
आला. त्यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती
दिली आणि वरिष्ठ
पोलीस निरीक्षक अतुल
भोस, तपास पथकाचे
सहायक पोलीस निरीक्षक राहुल
यादव, तसेच तपास
पथकातील पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहोचले. जखमी देवा उर्फ
देविदास पालते यास तात्काळ ॲम्ब्युलन्सने ससून
रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले,
मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला
मृत घोषित केले.
या घटनेनंतर, तपास
पथकातील पोलीस अंमलदार यांना
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे
खुनातील संशयीत आरोपी गजानन
हरिशचंद्र राठोड (वय ३२,
रा. हिवाळणी तलाव,
पो. आडगाव, ता.
पुसद, जि. यवतमाळ)
आणि महारुद्र शिवाजी
गवते (वय २७,
रा. साई धाम,
धायरी, पुणे) यांना
ताब्यात घेण्यात आले. त्यांची सखोल
चौकशी केली असता,
त्यांनीच देवा उर्फ देविदास पालते
यांचा खून केल्याची कबुली
दिली.
या
कामगिरीमुळे नांदेड सिटी पोलिसांनी आपल्या
कार्यक्षमतेचे
प्रदर्शन केले आहे. पुढील
तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे)
नितीन गोरे करत
आहेत.
Murder, Arrest, Pune Police, Crime Solved, Dhayari
#PunePolice #MurderArrest #NandedCityPolice #CrimeNews #Dhayari

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: