पुणे, २९ जुलै: पुणे
शहर पोलीस आयुक्त
श्री. अमितेश कुमार
यांच्या "नो टॉलरन्स"
या धोरणानुसार, अवैध
आणि बेकायदेशीर धंदे
करणाऱ्यांवर कठोर कारवाई
करण्यात येत आहे.
याचाच
एक भाग म्हणून,
फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील
एका कुंटणखान्यावर कारवाई
करत तो तीन
वर्षांसाठी सील करण्यात
आला आहे.
या
कुंटणखान्यात अल्पवयीन बांगलादेशी मुलींकडून
जबरदस्तीने
वेश्याव्यवसाय करून घेतला
जात होता.
फरासखाना
पोलीस ठाण्यात दाखल
असलेल्या गुन्हा क्र. ६८/२०२५, भा.न्या.सं. कलम-
१४४, ९६, ९८,
९९, ३०४, ३५१(२), ११५(२), १२७
(४), १३७(२),
६४, ४९, पोक्सो
ॲक्ट कलम ४,
१७ व अनैतिक
मानवी वाहतूक, व्यापार
प्रतिबंध अधिनियम १९५६ चे
कलम ३, ४,
५, ६, ७
प्रमाणे अटक करण्यात
आलेल्या आरोपींमध्ये बबिता मोहम्मद
शबीर शेख (वय
६१, रा. बुधवार
पेठ, पुणे, मॅनेजर)
आणि
चंपा उर्फ विष्णुमाया
दिनेश लामा (वय
५१, रा. बुधवार
पेठ, पुणे, मूळगाव
नेपाळ, कुंटणखाना चालक) यांचा
समावेश आहे. या
आरोपींकडून बांगलादेशी अल्पवयीन मुलींकडून
जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे
समोर आले होते,
ज्यामुळे त्यांचे व्यवसायाचे ठिकाण
सील करण्याचे आदेश
देण्यात आले होते.
सदर
कुंटणखाना, जो बुधवार
पेठेतील सि. स.
नं. ९९४, नवीन
बिल्डिंग, तिसरा मजला, फ्लॅट
नं. १८/ए, पुणे-४११००२ येथे होता
, तो
सील करण्याच्या प्रक्रियेसाठी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत
भस्मे, फरासखाना पोलीस ठाणे,
पुणे शहर , यांनी
अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम
१९५६ चे कलम
१८ (१) (अ)
अन्वये
तत्कालीन पोलीस उप आयुक्त,
परिमंडल १, पुणे
शहर, श्री. संदीपसिंह गिल्ल,
आणि अपर पोलीस
आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग,
पुणे शहर, श्री.
राजेश
बनसोडे,
यांच्या मार्फतीने पोलीस आयुक्त
तथा अतिरिक्त जिल्हा
दंडाधिकारी, पुणे शहर,
श्री. अमितेश
कुमार , यांना
प्रस्ताव सादर केला
होता.
या
प्रकरणाची सुनावणी करून पोलीस
आयुक्त अमितेश कुमार यांनी
अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम
१९५६ चे कलम
१८ (१) (अ)
अन्वये सदर कुंटणखान्यामधून
आरोपींना निष्कासित करून तो
०३ वर्षांकरीता सीलबंद
करण्याचे आदेश पारित
केले होते.
दिलेल्या
आदेशाप्रमाणे, २८ जुलै
२०२५ रोजी वरिष्ठ
पोलीस निरीक्षक प्रशांत
भस्मे यांनी दोन
पंचांसमक्ष सदर कुंटणखाना
सीलबंद केला आहे.
ही
कामगिरी वरिष्ठ निरीक्षक प्रशांत
भस्मे, निरीक्षक गुन्हे उत्तम
नामवाडे व निरीक्षक गुन्हे अजित
जाधव,
सहा. निरी.
वैशव
गायकवाड, पोउनि
अरविंद शिंदे, सहाय्यक फौजदार अजय
खराडे , अंमलदार पुंडलिक जुंबड,
सुवर्णा मोरे व
दिव्या जाधव यांच्या
पथकाने केली आहे.
Human Trafficking,
Brothel Sealed, Minor Exploitation, Police Action, Anti-Vice
#PunePolice #HumanTrafficking
#BrothelSealed #ChildProtection #AntiVice #BudhwarPeth
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: