पुणे, २८ जुलै: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे शहरातील विविध ठिकाणी स्थानिक मंडळे आणि राजकीय पक्ष कार्यकर्ते सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मिरवणुकीने येणार आहेत. यावेळी जेधे चौक ते सारसबाग दरम्यानच्या बालाजी विश्वनाथ पथावर मोठ्या प्रमाणावर नागरिक जमण्याची शक्यता आहे. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरक्षित व सुरळीत ठेवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात आवश्यकतेनुसार बदल केले आहेत.
पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा,
पुणे शहर, हिंमत
जाधव यांनी महाराष्ट्र शासन
गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार मोटार
वाहन कायद्यातील अधिकारांचा वापर
करून, स्वारगेट परिसरातील वाहतुकीत सकाळी
७.०० वाजेपासून आवश्यकतेनुसार खालीलप्रमाणे बदल
जाहीर केले आहेत:
वाहतुकीतील प्रमुख बदल आणि पर्यायी मार्ग:
जेधे चौकातून सारसबागकडे जाणारी वाहतूक बंद: सिंहगड रोडकडे जाण्यासाठी वाहनचालकांनी जेधे चौकाकडून सातारा रोडने सरळ व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक मार्गे सिंहगड रोडला जावे.
सिंहगड रोडकडून स्वारगेटकडे जाण्यासाठी: दांडेकर पुल, नाथ पै चौक, ना.सी. फडके चौक, पुरम चौक, टिळक रोडने जेधे चौक या मार्गाचा वापर करावा.
कात्रजकडून सारसबागकडे येणाऱ्या वाहनांसाठी: जेधे चौकातील वाय जंक्शन (फ्लायओव्हर) वरुन सारसबागकडे जाण्याऐवजी लक्ष्मीनारायण (व्होल्गा चौक) चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.
वेंगा सेंटर ते सारसबाग पर्यंत ग्रेडसेपरेटरमधून प्रवेश बंद: या भागातून घोरपडी पेठ उद्यान, राष्ट्रभूषण चौक पासून हिराबाग चौकाकडून इच्छित स्थळी जावे.
सावरकर चौकापासून पुरम चौकापर्यंत जाणारी वाहतूक बंद: सावरकर चौक, दांडेकर पूल, नाथ पै चौक, कल्पना हॉटेलकडून डावीकडे वळून ना.सी. फडके चौक, टिळक रोड मार्गे इच्छित स्थळी जावे.
दांडेकर पुल / सिंहगड जंक्शन येथून सावरकर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद: पर्यायी मार्ग म्हणून सावरकर चौक, दांडेकर पूल, नाथ पै चौक, कल्पना हॉटेलकडून डावीकडे वळून टिळक रोड, पुरम चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
पुरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावरील एकेरी वाहतूक दुहेरी करण्यात येईल.
दांडेकर पूल व सावरकर चौक येथील वाहतूक: आवश्यकतेनुसार दुपारी ३.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत शिथिलता देऊन दुहेरी प्रवेश देण्यात येईल.
निलायम ब्रिजने सावरकर चौकाकडे येणारी वाहतूक: आवश्यकतेनुसार निलायम ब्रिजवरून पर्वती गाव मार्गे वळविण्यात येईल.
शिवाजी रोड वरील वाहतूक आणि सेव्हन लव्हज चौकातून जेधे चौकाकडे जाणारी वाहतूक: आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल.
पार्किंग व्यवस्था: सातारा
रोडकडून मित्रमंडळ चौक मार्गे सावरकर
चौकाकडे येणाऱ्या दुचाकी वाहनचालकांनी आपली
वाहने पाटील प्लाझा
येथे पार्क करावीत.
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना उपलब्ध
पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक
पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Traffic Diversion, Pune, Annabhau Sathe Jayanti, Road Closure, Public Notice
#PuneTraffic #AnnabhauSatheJayanti #TrafficDiversion #PunePolice
#RoadClosure

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: