म्हाडा पुणे मंडळातर्फे ५३ अनिवासी आणि २८ कार्यालयीन गाळ्यांच्या ई-लिलावासाठी नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

 


पुणे, दि. २४ जुलै २०२५: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत ५३ अनिवासी आणि २८ कार्यालयीन गाळे विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला १ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ई-लिलाव आणि नोंदणी प्रक्रिया

५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव https://eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. ई-लिलावाचा एकत्रित निकाल लिलावाची बोली संपल्यावर दोन कार्यालयीन दिवसानंतर जाहीर करण्यात येईल.

पुणे मंडळातील अनिवासी आणि कार्यालयीन गाळे ई-लिलावामार्फत विक्रीसाठी, ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी https://eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन भरणे यासाठी १ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ई-लिलावाकरिता आरटीजीएस (RTGS) आणि एनईएफटी (NEFT) द्वारे अनामत रकमेचा भरणा १ ऑगस्ट रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत करता येणार आहे.

विक्रीसाठी उपलब्ध गाळे

लिलावात पुणे येथील पिंपरी वाघेरे येथे २० अनिवासी गाळे, २२ कार्यालयीन गाळे, पिंपरी पुणे येथील संत तुकाराम नगर येथे ०९ अनिवासी गाळे, म्हाळुंगे पुणे येथे ०५ अनिवासी गाळे, सांगली येथे १० अनिवासी गाळे, मिरज येथे ०१ अनिवासी गाळा, सोलापूर येथे ०६ कार्यालयीन गाळे, शिरूर पुणे येथे ०८ अनिवासी गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


MHADA, Pune, E-Auction, Non-Residential Premises, Office Premises, Solapur, Sangli, Deadline Extension, Property Sale, Maharashtra Housing, Real Estate

#MHADA #Pune #EAuction #PropertySale #OfficeSpace #NonResidential #RealEstate #Maharashtra #DeadlineExtended #Solapur #Sangli

म्हाडा पुणे मंडळातर्फे ५३ अनिवासी आणि २८ कार्यालयीन गाळ्यांच्या ई-लिलावासाठी नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ म्हाडा पुणे मंडळातर्फे ५३ अनिवासी आणि २८ कार्यालयीन गाळ्यांच्या ई-लिलावासाठी नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ Reviewed by ANN news network on ७/२४/२०२५ १२:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".