भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अपहरण
झालेल्या मुलीची सुखरूप सुटका, २ आरोपींना अटक
पुणे, २९ जुलै: भारती
विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि
गुन्हे शाखा युनिट-२, पुणे
शहर यांनी एक
महत्त्वपूर्ण कामगिरी करत, भीक
मागण्यासाठी अपहरण केलेल्या एका
२ वर्षांच्या मुलीची
धाराशीव जिल्हयातून सुखरूप सुटका
केली आहे.
या
प्रकरणी अपहरण करणाऱ्या टोळीतील
पाच आरोपींना अटक
करण्यात आली असून,
पोलिसांनी त्यांच्या कौशल्यपूर्ण तपासाचे
प्रदर्शन केले आहे.
दिनांक
२५ जुलै २०२५
रोजी रात्री ९
वाजण्याच्या सुमारास ते २६
जुलै २०२५ रोजी
पहाटे १.३०
वाजण्याच्या सुमारास वंडर सिटी
झोपडपट्टी, पाण्याचे टाकीजवळ, कात्रज,
पुणे येथून फिर्यादींच्या
२ वर्षांच्या मुलीला
कोणीतरी झोपेतून उचलून पळवून
नेले होते.
या
घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलीस
स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता
कलम १३७ (२)
अन्वये गुन्हा दाखल करण्यात
आला होता.
हा
गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने
आणि पिडीत मुलगी
अवघ्या २ वर्षांची
असल्याने, पुणे शहर
पोलीस आयुक्तांनी तात्काळ
मुलीचा शोध घेण्याचे
आदेश सर्व अधिकार्यांना
दिले होते.
त्यानुसार,
भारती विद्यापीठ पोलीस
स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
श्री. राहुल
खिलारे यांनी
तपास पथकाचे पोलीस
अधिकारी व पोलीस
अंमलदार यांच्या दोन पथके
तयार केली.
तसेच,
गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी
व पोलीस अंमलदार
यांची पथके आणि
इतर पोलीस स्टेशनमधील
तपास पथके तयार
करून कात्रज ते
पुणे रेल्वे स्टेशन
दरम्यानच्या रस्त्यावरील आस्थापनांचे सीसीटीव्ही
कॅमेरे तपासण्यात आले.
या
तपासणीत दोन पुरुष
आणि एक महिला
हे एका दुचाकीवरून
पिडीत मुलीस पुणे
रेल्वे स्टेशनमध्ये घेऊन जाताना
दिसुन आले.
पुणे
रेल्वे स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरांची
पाहणी करता त्याठिकाणी
पिडीत मुलीस पळवुन
आणणारे तीन इसमांसोबत
आणखी दोन आरोपी
असल्याचे दिसुन आले.
सीसीटीव्ही
फुटेजच्या आधारे तपास करत
असताना, गुप्त बातमीदारांकडून माहिती
मिळाली की, धाराशीव
जिल्हयातील तुळजापूर येथे अशाच
वर्णनाची एक २
वर्षांची मुलगी भीक मागताना
दिसली आहे.
ही
माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस
निरीक्षक राहुल खिलारे यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोकाशी,
सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष
कवठेकर आणि तपास
पथकातील पोलीस अंमलदार यांचे
एक पथक तातडीने
धाराशीव जिल्ह्याकडे रवाना झाले.
स्थानिक
धाराशीव एलसीबी पोलिसांच्या मदतीने
पथकाने
आरोपींचा ठावठिकाणा शोधून सुनील
सीताराम भोसले (५१), शंकर
उजन्या पवार (५०), शालुबाई
प्रकाश काळे (४५), गणेश
बाबू पवार (३५)
आणि मंगल हरफुल
काळे (१९) या
पाच आरोपींना ताब्यात
घेतले.
नमुद
आरोपींकडे तपास करता
त्यांच्याकडे दाखल गुन्ह्यातील
पिडीत ०२ वर्षाची
मुलगी सुखरूप मिळून
आली.
नमुद
आरोपींनी पिडीत मुलीस भीक
मागण्यासाठी अपहरण केल्याचे निष्पन्न
झाले आहे.
या
कामगिरीमुळे पुणे पोलिसांनी
अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या गंभीर
गुन्हेगारीला आळा घालण्यात
यश मिळवले आहे.
Child Abduction, Rescue
Operation, Arrest, Human Trafficking, Pune Police, Begging Racket
#ChildRescue #PunePolice
#Abduction #HumanTrafficking #CrimeNews #Katraj #Dharashiv
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: