छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित दापोलीतील सुवर्णदुर्गाचा समावेश
मराठा लष्करी स्थापत्यकलेला युनेस्कोची मान्यता;
पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयात ऐतिहासिक निर्णय; भारतासाठी अभिमानाचा क्षण
रत्नागिरी, ११ जुलै २०२५: मराठा लष्करी स्थापत्यकला (Maratha Military Landscape) आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली आहे. पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात झालेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय एकमताने घेण्यात आला, ज्याला २१ सदस्य राष्ट्रांकडून भारताच्या नामनिर्देशनाला मान्यता मिळाली.यामर्ह्ये रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै येथील सुवर्णदुर्ग या जलदुर्गाचा समावेश आहे.
हा अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले त्यांच्या अद्वितीय आणि जागतिक मूल्यासाठी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले गेले आहेत. हे किल्ले १७ व्या शतकातील लष्करी स्थापत्यकला आणि धोरणात्मक नियोजनाचा एक अनोखा पुरावा आहेत, जे मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरले.
समाविष्ट किल्ल्यांची यादी: नव्याने घोषित केलेल्या या जागतिक वारसा स्थळात महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडूमधील एक किल्ला समाविष्ट आहे, जे मराठा काळातील दूरवरचा प्रभाव आणि अभियांत्रिकी कौशल्ये दर्शवतात. जागतिकस्तरावर मान्यता मिळालेले १२ किल्ले असे आहेत:
शिवनेरी
राजगड
लोहगड
साल्हेर
रायगड
खांदेरी
सुवर्णदुर्ग (दापोली, रत्नागिरी)
विजयदुर्ग
सिंधुदुर्ग
प्रतापगड
पन्हाळा
जिंजी (तामिळनाडू)
ही घोषणा मराठा साम्राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि ऐतिहासिक महत्त्वाचा पुरावा आहे. ज्यामुळे या प्रतिष्ठित वास्तूंचे जतन केले जाईल आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी त्या प्रेरणादायी ठरतील. हा भारतासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणाऱ्या प्रत्येकासाठी एक अभिमानाचा क्षण आहे.
ऐतिहासिक !
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 11, 2025
अभिमानास्पद !!
गौरवशाली क्षण !!!
आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना
महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा !!!!
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन...
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!
मला हे सांगताना अतिशय…

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: