पुणे: मंगळवारी (२९ एप्रिल २०२५) आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीने आयोजित केलेल्या तेहतिसाव्या श्रमउद्योग परिषदेत प्रतिमा काळे यांच्या "कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात पार पडलेल्या विविध पुरस्कार प्रदान सोहळ्यात मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी परिषदेचे उद्घाटन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डॉ. सुनीताराजे पवार होत्या. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे आणि पुरुषोत्तम सदाफुले हे उपस्थित होते.
या प्रसंगी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांना 'पद्मश्री नारायण सुर्वे जीवनसाधना सन्मान' देऊन सन्मानित करण्यात आले. 'मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान' कविवर्य माधव पवार यांच्या सहधर्मचारिणी चारुलता माधव पवार यांना प्रदान करण्यात आला. कष्टकरी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांना 'नारायण मेघाजी लोखंडे स्मृती कष्टकरी हितसंवर्धन संघटना पुरस्कार' तर माणिकराव ढोकले यांना 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
........................................................
#AhilyadeviHolkar
#BookLaunch
#MarathiLiterature
#PuneEvents
#LabourDay
#MaharashtraDay
#PratimaKale
#NarayanaSurveAkademi
#TricentennialCelebration

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: