कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार जगताप म्हणाले, "पारंपरिक शिक्षणाला आधुनिकतेची जोड देत पिंपरी चिंचवड महापालिका गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महापालिका अत्यंत सकारात्मक पाऊले टाकत असून शहराच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करत आहे ही अभिमानास्पद बाब आहे."
महापालिकेने या शाळेच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता दिली असून, येत्या १८ महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. नवीन इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमास माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसदस्य सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नामदेव ढाके, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, माजी नगरसदस्या आश्विनी चिंचवडे, मोनाताई कुलकर्णी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान आमदार जगताप यांनी राज्य शासनाच्या शंभर दिवसीय उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
प्रत्येक मजल्यावर असणार विविध सुविधा
-
पहिला मजला: मुख्याध्यापक कार्यालय, स्टाफरूम, प्रयोगशाळा, वाचनालय, अॅक्टिव्हिटी रूम, ग्रंथालय, ३ वर्गखोल्या, मुले व मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह
-
दुसरा मजला: संगणक कक्ष, स्टोअर रूम, मेडिकल रूम, ६ वर्गखोल्या, मुले व मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह
-
तिसरा मजला: मुख्याध्यापक कार्यालय, स्टाफरूम, प्रयोगशाळा, वाचनालय, अॅक्टिव्हिटी रूम, ग्रंथालय, ३ वर्गखोल्या, मुले व मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह
-
चौथा मजला: संगणक रूम, स्टोअर, कन्सल्टेशन रूम, ६ वर्गखोल्या, मुले व मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह
-
पाचवा मजला: बहुउद्देशीय हॉल, भाषा कक्ष, पॅंट्री, ५ वर्गखोल्या, मुले व मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: