पुणे : खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे निलंबन झाले आहे. या आधी खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचे निलंबन झाले होते. नागरिक आणि वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे आणि कोरोनाकाळात नियमांचे उल्लंघन करणे या तक्रारींवरून राज्य शासनाने गुरुवारी (ता. ११) बेडसे यांच्यावर कारवाई केली आहे.
निलंबनाबरोबरच बेडसे यांची विभागीय चौकशीसुद्धा सुरू करण्यात आली आहे. निलंबनाच्या काळात बेडसे यांचे मुख्यालय पुणे जिल्हाधिकारी कार्यालय राहील, आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, असे महसूल विभागाचे अवर सचिव संजीव राणे यांनी आदेशात म्हटले आहे.
निलंबनाच्या काळात बेडसे यांनी खासगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा अथवा व्यापार करू नये. असे केल्यास त्यांना निर्वाह भत्ता मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. बेडसे हे मोहोळ आणि खेड येथे कार्यरत असताना कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, नागरिक आणि वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे जनतेत शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे, यामुळेच बेडसे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
७/१२/२०२४ १०:५७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: