कुर्नूल: आंध्र प्रदेशात हैदराबाद-बंगळूर महामार्गावर आज पहाटे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. हैदराबादहून बंगळूरकडे निघालेल्या एका खासगी व्होल्वो (Volvo) बसला कल्लूर मंडल येथील चिन्नतेकुळूर गावाजवळ अचानक आग लागल्याने किमान २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वी 'अस्त्र न्यूज नेटवर्क'वर प्रसिद्ध झालेल्या भविष्यवेधी लेखातील 'अपघात आणि अग्नीतून दुर्घटना' घडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानंतर दुसरयाच दिवशी १४ ऒक्टोबर रोजी राजस्थानातील जैसलमेर जवळ नव्या कोरया बसला आग लागून २० जणांचा मृत्यू झाला होता. आज कुर्नूल येथेही बसला आग लागून २० जणांचाच मृत्यू झाला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु या भाकिताची अचूकता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
जिल्हाधिकारी ए.
सिरी यांनी
दिलेल्या माहितीनुसार, पहाटे
३ ते ३.१० च्या दरम्यान ही
दुर्घटना घडली. बसची एका
दुचाकीला धडक बसल्याने हा
अपघात झाला. धडकेनंतर दुचाकी
बसच्या खालच्या भागात
अडकली आणि इंधनाची गळतीझाली. बसच्या वायरींगचे
शॊर्टसर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला.
रात्रीची वेळ आणि बसचे
दरवाजे विजेच्या वायरिंगच्या नुकसानीमुळे बंद
पडल्याने प्रवाशांना बाहेर पडणे अशक्य
झाले.दुर्घटनेची
माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी पोहोचून तत्परता दाखवत
२१ प्रवाशांना बाहेर
काढले, परंतु २०
जण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
दोन्ही चालक मात्र
वेळीच बाहेर पडण्यात यशस्वी
झाले.
अपघात
इतका भीषण होता
की प्रवाशांना जीव
वाचवण्यासाठी खिडक्या फोडून बाहेर पडावे
लागले. ज्यांना बाहेर
काढण्यास वेळ लागला
त्यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत
आहे. जखमींना तातडीने कुर्नूल येथील
शासकीय रुग्णालयात दाखल
करण्यात आले आहे. बस
पूर्णपणे जळून खाक झाली
आहे. बचाव पथकांच्या प्रयत्नांमुळे अनेकांचे प्राण
वाचले असले तरी,
२० जणांना वाचवता
आले नाही, याचे
दुःख पथकातील
कर्मचारयांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
या
भीषण घटनेवर देशभरातून तीव्र
शोक व्यक्त करण्यात आला
आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता
निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये
आणि जखमींना ५०,००० रुपये तात्काळ मदत
जाहीर केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपतींनीही श्रद्धांजली वाहिली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.
चंद्रबाबू नायडू यांनी तीव्र
दुःख व्यक्त करत
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत
आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदतीचे
आश्वासन दिले आहे. केंद्रीय गृह
राज्यमंत्री बंदी संजय कुमार
यांनीही यावर तीव्र दुःख
व्यक्त केले आहे.
या
घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश
देण्यात आले असून, बसचे
नोंदणी तपशील, फिटनेस
प्रमाणपत्र आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन
झाले आहे की
नाही, याची कसून
तपासणी केली जाणार
आहे. हैदराबाद-बंगळूर
महामार्गावर खासगी प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षेबाबत, विशेषतः रात्रीच्या वेळी
चालवल्या जाणाऱ्या वाहनांच्या देखभालीबाबत पुन्हा एकदा गंभीर
प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Labels: Kurnool Bus Fire, Andhra Pradesh Bus Accident, Volvo Bus Fire, Hyderabad-Bangalore Highway Accident, Astra News Prediction, Astrology Prediction Comes True, Fire Accident Prediction, Prophetic Warning, Astrological Forecast Accuracy, Road Safety India, Bus Fire Tragedy, Passenger Bus Accident, Highway Safety, Transport Accident India
Search Description: A horrific bus fire on the Hyderabad-Bangalore highway near Kurnool, Andhra Pradesh, killed at least 20 passengers after a private Volvo bus caught fire following a collision with a two-wheeler. Shockingly, this tragedy matches the astrological prediction published days earlier by 'Astra News Network' warning about accidents and fire-related disasters. The incident occurred in the early hours near Chinnatekudu village. Electric wiring damage trapped passengers inside as flames engulfed the bus. PM Modi announced compensation, and a high-level investigation has been ordered into this predicted tragedy.
Hashtags: #KurnoolBusFire #AstraNewsPrediction #AstrologicalPrediction #PredictionComeTrue #PropheticWarning #AndhraPradeshAccident #BusTragedy #AstrologyAccuracy #FireAccidentPredicted #HyderabadBangaloreHighway #RoadSafety #BusFireAccident #AstrologicalForecast #IndiaNews #TransportSafety #BreakingNews #KurnoolAccident #HighwaySafety #VolvoBusFire #AstraNews #PredictedTragedy #AstrologyNews #FireAccident #PassengerSafety #TragicAccident
Reviewed by ANN news network
on
१०/२४/२०२५ ०३:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: