मुंबई : महाभारत या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेत शकुनीमामाची भूमिका साकारणारे अभिनेता गुफ़ी पेंटल यांचे ५ मे रोजी सकाळी मुंबईतील रुग्णालयात निधन जाले, ते ७८ वर्षांचे होते.
मूत्रपिंड आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या पेंटल यांच्यावर सुरुवातीला फ़रिदाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले. आठवडाभरापेक्षा जास्त काळ ते मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
पेंटल यांनी १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘रफू चक्कर’ चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही काम केले आहे. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत ‘शकुनी मामा’ या भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. या पात्रामुळे ते घराघरात पोहोचले. त्यांचा मालिकेतील अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांनी बीआर फिल्म्ससोबत असोसिएट डायरेक्टर, कास्टिंग डायरेक्टर आणि प्रोडक्शन डिझायनर म्हणूनही काम केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: