वंचित बालकांच्या मदतीसाठी 'रोटरी सॅटेलाईट क्लब स्पोर्ट्स सिटी इन्स्पिरा ' चा उपक्रम
पुणे : वंचित बालकांच्या मदतीसाठी 'रोटरी सॅटेलाईट क्लब स्पोर्ट्स सिटी इन्स्पिरा' ने आयोजित केलेल्या 'ऑल स्टार्स क्रिकेट चॅम्पियनशिप टूर्नामेंट' मध्ये 'टाटा मोटर्स ' संघ विजयी झाला.त्यांना ५५ हजार रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.
ही स्पर्धा २७ मे ते ४ जून दरम्यान डी वाय पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झाली. रोटरी तसेच कॉपोरेट जगतातून एकूण १२ संघानी भाग घेतला. या स्पर्धेतून आलेल्या निधीतून वंचित बालकांना मदत केली जाणार आहे.स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी 'रोटरी सॅटेलाईट क्लब स्पोर्ट्स सिटी इन्स्पिरा 'चे अध्यक्ष डॉ.भरत पाटील,स्पर्धेचे निमंत्रक मुकेश गुप्ता,डॉ.सिद्धार्थ गौर,आशिष गावडे,प्रवीण कुदळे,डॉ सुलतान रफई उपस्थित होते.हा कार्यक्रम ४ जून रोजी झाला.मॅग्निफिक सिक्युरिटीज,२४के क्राफ्ट ब्र्यूझ ,बजाज ऑटो,सिम्प्लिफाय सक्सेस यांनी स्पर्धेच्या आयोजनात सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: