टीव्हीएस मोटर कंपनीद्वारे 'अल्टीमेट स्ट्रीट वेपन' – २०२५ टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० लाँच; आधुनिक रायडर्ससाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

 


बेंगळुरू, १८ जुलै २०२५: रेसिंगचा चार दशकांचा समृद्ध वारसा लाभलेल्या टीव्हीएस मोटर कंपनी (TVSM) – या दुचाकी व तीनचाकी क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीने आज '२०२५ टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१०' लाँच केली. 'रायडर-फर्स्ट' या मानसिकतेसह बनवण्यात आलेले हे रिफ्रेश्ड मॉडेल बोल्ड ग्राफिक्स, सुधारित डिजिटल वैशिष्ट्ये आणि नव्या तंत्रज्ञानासह भारतीय रस्त्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट कामगिरी

OBD2B चे पालन करणारी २०२५ टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० स्मार्ट कामगिरीची नवीन व्याख्या प्रस्थापित करत आहे. यामध्ये रिअल टाइम एमिशन मॉनिटरिंग, जास्त वेगवान प्रतिसाद आणि सुधारित इंजिन देण्यात आले आहे. नेक्स्ट-जेन, मल्टी-लँग्वेज, UI/UX क्लस्टरमुळे ही बाईक जास्त इंट्यूटिव्ह आणि इमर्सिव्ह राइड देते, तसेच त्यात शाश्वतता, नावीन्य आणि रायडरचे समाधान नव्या पातळीवर नेले आहे.

क्षेत्रातील प्रथम वैशिष्ट्ये आणि नवीन तंत्रज्ञान

२०२५ टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० ही फॅक्टरी कस्टमायझेशन पर्याय देणारी या क्षेत्रातील पहिलीच गाडी असून, हा पर्याय टीव्हीएस बिल्ट-टु-ऑर्डर (BTO) प्लॅटफॉर्मद्वारे देण्यात येणार आहे. डायनॅमिक प्रो किटमध्ये की लेस राइड सिस्टीम, RT-DSC मध्ये ड्रॅग टॉर्क कंट्रोल आणि लाँच कंट्रोल वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. ट्रान्सपरंट क्लच कव्हर, कॉर्नरिंग ड्रॅग टॉर्क कंट्रोल (बीटीओ), नवीन जेन-२ क्लस्टर, मल्टी-लँग्वेज UI, USD ४३ DIA फ्रंट सस्पेन्शन (बेस व्हेरिएंट), सिक्वेन्शियल टर्न सिग्नल लॅम्प (TSL) नव्या स्टायलिंगसह, हँड गार्ड्स, ड्रॅग टॉर्क कंट्रोल (DTC), लाँच कंट्रोल (RT-DSC) – डायनॅमिक प्रो किट, आणि ग्राफिक्स रिफ्रेशसह नवीन रंगांचे पर्याय ही तिची नवी वैशिष्ट्ये आहेत.

डिझाइन आणि कार्यक्षमता

२०२५ साठी नव्याने तयार करण्यात आलेल्या टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० मध्ये तीन नवीन, बोल्ड रंगांचे पर्याय, ठळक ग्राफिक्स व पारदर्शक क्लच कव्हर तसेच अद्ययावत सिक्वेन्शियल TSL सह देण्यात आले आहेत. यामुळे या मोटरसायकलचा आक्रमक, भविष्यवेधी स्ट्रीटफायटर लूक आणखी उठावदार झाला आहे. सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्ड हँड गार्ड्स देण्यात आले आहेत. TVS च्या जागतिक रेसिंग वारशाला सलाम म्हणून आयकॉनिक रेस रेप्लिका सेपांग ब्लू टॉप-एंट BTO व्हेरिएंटवर कायम ठेवण्यात आले आहे.

ही मोटरसायकल ३५.६ PS@९,७०० rpm आणि २८.७ Nm@६,६५० rpm देणारी असून, दर्जेदार कामगिरीचा वारसा जपणारी आहे.

किंमत आणि उपलब्धता

२०२५ टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० आकर्षक प्रारंभिक किंमतीत उपलब्ध करण्यात आली असून त्या पुढीलप्रमाणे आहेत:

  • बेस व्हेरिएंट: रु. २,३९,९९०

  • टॉप व्हेरिएंट: रु. २,५७,०००

  • बीटीओ: रु. २,७५,००० पासून सुरुवात

ही मोटरसायकल पाच व्हेरिएंट्समध्ये (बीटीओ कस्टमायझेशनसह) दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या शहरांत १६ जुलै २०२५ पासून उपलब्ध केली जाणार आहे. या लाँचविषयी टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रमुख व्यवसाय – प्रीमियम विमल सुंबली म्हणाले, '२०२५ टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० लाँच करण्यात आल्यापासूनच नेकेड स्पोर्ट्स क्षेत्रात ट्रेंडसेटर ठरली आहे. २०२५ एडिशनसह आम्ही आधुनिक तंत्रज्ञान, इंट्यूटिव्ह डिजिटल इंटरफेजेस, स्टँडआउट स्टायलिंग आणि रायडर सुरक्षेसाठी अविरत बांधिलकी जपत नवा वारसा तयार करत आहोत.'


 TVS Motor Company, 2025 TVS Apache RTR 310, Motorcycle Launch, Naked Sports Bike, Smart Performance, OBD2B, Built-To-Order (BTO), Keyless Ride, Drag Torque Control, Bengaluru, New Bike Price

 #TVSMotor #ApacheRTR310 #BikeLaunch #Motorcycle #StreetWeapon #NewBike #TVSApache #Bengaluru #AutomotiveNews #RTR310

टीव्हीएस मोटर कंपनीद्वारे 'अल्टीमेट स्ट्रीट वेपन' – २०२५ टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० लाँच; आधुनिक रायडर्ससाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान टीव्हीएस मोटर कंपनीद्वारे 'अल्टीमेट स्ट्रीट वेपन' – २०२५ टीव्हीएस अपाचे आरटीआर ३१० लाँच; आधुनिक रायडर्ससाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान Reviewed by ANN news network on ७/१८/२०२५ ०६:०२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".