खेड: शिवसेनेचे विद्यमान तालुकाप्रमुख विजय जाधव यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी आज बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी दिली.
खेड शिवसेना तालुकाप्रमुख म्हणुन विजय जाधव गेली दीड वर्षे कार्यरत होते मात्र गेल्या आठ महिन्यांपासून पक्षविरोधी कारवाया करत असल्याचे शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. याबाबत पक्षाच्या वरीष्ठ पातळीवर गंभीर दखल घेत आज बुधवारी जाधव यांची हकालपट्टी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नूतन तालुकाप्रमुख म्हणून विद्यमान तालुका शिवसेना सचिव सचिन धाडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात जून महिन्यात शिवसेना अंतर्गत झालेल्या दुफळी नंतर खेड तालुक्यातील बहुसंख्य शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता.
दरम्यान माजी तालुकाप्रमुख विजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, राज्यात जून महिन्यात शिवसेना अंतर्गत फ़ूट पडल्यानंतर आपण येथील शिवसेना पक्षापासून अलिप्त आहोत त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून उद्भव ठाकरे यांच्या सोबत यापुढे काम करणार आहे.
 Reviewed by ANN news network
        on 
        
२/२२/२०२३ ०६:१६:०० PM
 
        Rating:
 
        Reviewed by ANN news network
        on 
        
२/२२/२०२३ ०६:१६:०० PM
 
        Rating: 

 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: