मंदार आपटे
मुंबई : दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कदम हे येत्या ५ तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या खेड येथील जाहीर सभेत पक्ष प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या असंख्य समर्थकांसह आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खेड तालुकाप्रमुख आणि विजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यामुळे जाधव यांचा पक्षप्रवेश रामदास कदमांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, मी ५ तारखेला खेडमध्ये येणार आहे. खेडची सभा विराट झालीच पाहिजे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा. आता संजय कदमांची साथ मिळाली असल्याने आपल्या पक्षाचे भविष्य उज्वल आहे. शिवसेनेने अशा अनेक संकटांशी संघर्ष केला आणि पुढे गेली. याही संकटावर मात करत आपण पुढे जाऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 Reviewed by ANN news network
        on 
        
२/२२/२०२३ ०५:४९:०० PM
 
        Rating:
 
        Reviewed by ANN news network
        on 
        
२/२२/२०२३ ०५:४९:०० PM
 
        Rating: 


 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: