जागतिक मराठी अकादमी आणि डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी भूषण पुरस्कार आज श्री.ठाणेदार यांना प्रदान करण्यात आला. पिंपरी येथील डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.जे.पवार, अकादमीचे कोषाध्यक्ष उदय लाड, सदस्य सचिन ईटकर, शास्त्रज्ञ डॉ.मकरंद जावडेकर, उद्योगपती कल्याण तावरे, विद्यापीठाच्या संचालिका डॉ.स्मिता जाधव, डॉ.यशराज जाधव आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. श्री.ठाणेदार यांचा आज ६८ वा वाढदिवस असल्याने सुवासिनींनी औक्षण करून व केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रशासन आणि राजकारणी हे लोकशाही रचनेमध्ये बदल घडविणारे दोन मोठे स्तंभ असून ध्येय ठेवणे व सातत्याने प्रयत्न करणे हेच आपल्या अमेरिकेत यशस्वी उद्योजक होण्याचे व खासदार होण्याचे श्रेय असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.पी.डी. पाटील यांनी आपल्या भाषणात, जिद्द व आत्मविश्वास हा जीवनाचा पाया बनविण्याचा ठाणेदार यांचा आम्हाला सदैव अभिमान वाटत असल्याचे म्हटले.
यावेळी, कल्याण तावरे, डॉ.मकरंद जावडेकर यांचीही भाषणे झाली. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ.एन.जे.पवार यांनी आभार प्रकट केले.
सोबत फोटो- अमेरिकेतील पहिले मराठी खासदार, संशोधक व उद्योगपती श्रीनिवास ठाणेदार यांना ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डावीकडून कुलगुरू डॉ.एन.जे.पवार, कोषाध्यक्ष उदयदादा लाड, रामदास फुटणे, कुलपती पी.डी.पाटील, श्रीनिवास ठाणेदार, शास्त्रज्ञ डॉ.मकरंद जावडेकर, डॉ. स्मिता जाधव, सचिन इटकर आणि कल्याण तावरे.
 Reviewed by ANN news network
        on 
        
२/२२/२०२३ ०६:२५:०० PM
 
        Rating:
 
        Reviewed by ANN news network
        on 
        
२/२२/२०२३ ०६:२५:०० PM
 
        Rating: 

 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: