अश्विनी जगताप यांना निवडून आणण्यासाठी झोकून देऊन काम करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्या शिवसेना पदाधिका-यांच्या गाठीभेटी

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडून आणण्यासाठी झोकून देवून काम करावे. प्रचाराला केवळ तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्व कामे बाजूला ठेवून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचाअशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिका-यांना दिल्या.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यांनी शहरातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांसोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनसार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणशिवसेनेचे विधीमंडळातील प्रतोद भरत गोगावलेशिवसेना उपनेतेमाजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होते.


थेरगाव येथे पदाधिका-यांची बैठक घेतली. शिवसेना उपनेतेमावळचे खासदार श्रीरंग बारणेजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकरउपजिल्हाप्रमुख राजेश वाबळेमावळचे जिल्हा संघटक अंकुश देशमुखपिंपरी-चिंचवचे शहरप्रमुख निलेश तरसजिल्हा संघटिका शैला पाचपुतेयुवती संघटिका शर्वरी गावंडेउपशहर प्रमुख बशीर सुतारपिंपरी विधानसभा प्रमुख रुपेश कदमचिंचवड विधानसभा प्रमुख सुरेश राक्षेशहर संघटक सोमनाथ गुजररवींद्र ब्रह्मेहाजी शेखपिंपरी विधानसभा संघटक नरेश टेकाडेसंदीप पवारनिखील यवलेसमन्वयक सुनील पाथरमलचिंचवड विधानसभा संघटक रोहिदास दांगटसंतोष बारणेसुदर्शन देसलेसमन्वयक प्रदीप दळवीउपविधानसभा संघटक राजेश अडसूळअंकुश कोळेकरप्रशांत कडलगमहेश कलाल उपस्थित होते.

चिंचवडमधून भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या पाहिजेत.  प्रचाराला केवळ तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्व कामे बाजूला ठेवून झोकून देवून प्रचारात उतरावे. मतदारांपर्यंत पोहचा. रविवारी मतदानासाठी जास्तीत-जास्त मतदारांना बाहेर काढावेअशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसैनिकांना दिल्या.


खासदार श्रीरंग बारणे म्हणालेभाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयासाठी सर्व शिवसैनिक प्रचारात उतरले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री पहाटे चार वाजेपर्यंत काम करत असल्याचे पाहून शिवसैनिकांना आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली. शिवसैनिक तीन दिवस रात्रीचा दिवस करुन प्रचार करतील.

पहाटे चार वाजता मुख्यमंत्री भेटल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झोकून देवून काम करत आहेत. राज्याच्या विकासासाठी चोवीस तास काम करतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येक पदाधिका-यांशी संवाद साधला. सर्वांकडून चिंचवडचा आढावा घेतला. पहाटे चार वाजेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे आढावा घेत होते. चर्चा करत होते. पहाटे चार वाजता मुख्यमंत्री भेटल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पोटनिवडणुकीत पूर्ण ताकदिनीशी काम करण्याची ग्वाही सर्व पदाधिका-यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली.

अश्विनी जगताप यांना निवडून आणण्यासाठी झोकून देऊन काम करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अश्विनी जगताप यांना निवडून आणण्यासाठी झोकून देऊन काम करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Reviewed by ANN news network on २/२१/२०२३ ०५:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".