मंदार आपटे
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील पेठमाप येथील श्री गणेश क्रीडा मंडळ पेठमाप गणेशवाडी यांनी नुकतेच एक शैक्षणिक उपक्रमाबरोबरच एक सामाजिक स्तुत्य उपक्रम राबवून गावातील लोकांसाठी मोफत नेत्र तपासणी व रक्तगट तपासणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या मंडळामार्फत दरवर्षी अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असतात.शालेय विद्यार्थ्यांसाठी ते गावातील ग्रामस्थांसाठी अनेक उपक्रम आयोजन करण्यात येत असतात. वाढते डोळ्यांचे आजार व साथीचे पसरणारे रोग यामुळेच मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री. संदीप आग्रे व सरचिटणीस श्री.शशिकांत पवार तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी हा उपक्रम राबविण्याचे व आयोजन करण्याचे ठरवले.
यावेळी चिपळूण येथील नेत्रचिकित्सक डॉक्टर सौ.डॉ.अर्चना काटे -चिपळूण नेत्र रुग्णालय,चिपळूण नेत्र तपासणी व रक्तगट तपासणी सौ.वैशाली मॅडम यांनी काम पाहिले. सदर उपक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर गणेश मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक श्री. वसंत पवार ,गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. शशिकांत पवार तसेच मंडळाचे सल्लागार श्री. दीपक निंबरे सल्लागार श्री. नरेश काळे, श्री. गणेश क्रीडा मंडळ पेठमाप गणेशवाडी मंडळाचे अध्यक्ष श्री.संदीप आग्रे सरचिटणीस श्री. शशिकांत पवार ,मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर मंडळाच्या मोफत नेत्र तपासणी व रक्तगट तपासणीसाठी परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व विविध नागरिकांनी याचा लाभ घेतला.कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
Reviewed by ANN news network
on
२/२२/२०२३ १०:०६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: