पिंपरी : नक्राश्रू ढाळून पोटनिवडणूक बिनविरोध न करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवणार; पिंपळेगुरव आणि पिंपळेनिलखमधील जनतेचा सूर

पिंपरी :  लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड मतदारसंघाची प्रगती झाली. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे शहराची महानगराकडे वाटचाल सुरू झाली. त्यांनी इतर नेत्यांप्रमाणे मी अमुक करणार, मी तमुक करणार अशा पोकळ गप्पा मारल्या नाहीत. कृतीतून त्यांनी विकासकामे कशी करावीत, याचा आदर्श इतर राजकारण्यांपुढे उभा केला. त्यांची आज शहराला उणीव जाणवत आहे. त्यांच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हायला हवी होती. पण काही राजकारण्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हेच सिद्ध झाले आहे. आधी मगरीचे अश्रू ढाळायचे आणि प्रसंग आला की स्वार्थ पाहायचा हे आम्ही सहन करणार नाही. अशा दुटप्पी राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून आम्ही फक्त विकासाला म्हणजे भाजपला मत देणार, असा निर्धार पिंपळेनिलख आणि पिंपळेगुरवच्या जनतेने बुधवारी (दि. २२) केला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपशिवसेनाआरपीआय (आठवले गट)रासपशिवसंग्राम संघटनारयत क्रांती संघटनाप्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी पिंपळेनिलख परिसर बुधवारी पिंजून काढला. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा करून एक मत विकासाला, चिंचवडच्या प्रगतीला द्या, असे आवाहन मतदारांना केले. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. महिलांनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. माझ्या पतीने केलेला विकास, चिंचवड मतदारसंघाचा झालेला कायापालट आणि हा विकास निरंतर सुरू ठेवण्यासाठी मला मत द्याअसे आवाहन नागरिकांना केले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या विकासाची पंरपरा यापुढेही सुरू ठेवण्याचे वचन त्यांनी मतदारांना दिले.

यावेळी माजी उपमहापौर नानी घुलेनगरसेविका आरती चोंधेमाजी नगरसेवक धनराज बिर्दानितीन इंगवलेअशोक शिंदेकेवल जगतापविनोद सूर्यवंशीसिद्धू कलशेट्टीबसवराज कलशेट्टीप्रदीप सातरसप्रकाश कामठे,अभि हरसुळेसंतोष दळवीविकास इंगवलेविकास दळवीअनिल जेधेरवनक गरेवालचंदन कारमहेश चव्हाणविनोद सूर्यवंशीशिवाजी काळे जमदाडेपांडुरंग इंगवलेसुरेश इंगवलेराकेश कांबळेशिवाजीराव दळवीमहबूब शेखतात्या कामठेदिलीप इंगवलेबाळासाहेब इंगवलेमाऊली मुरकुटेगणेश कस्पटेसुभाष डुकरेदिलीप कामठेसंतोष साठेआनंद साठेसागर कांबळेगिरीश कांबळे यांच्यासह भाजप-शिवसेना तसेच मित्रपक्ष महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी घरोघरी दिलेल्या भेटीदरम्यान ज्येष्ठ नागरिक व महिलांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे पिंपळेनिलखचा कसा कायापालट झाला, याचे अनेक किस्से नागरिकांनी सांगितले. ते खरोखरच लोकनेते होते. त्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीला तोड नाही, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. अशा विकासपुरूषाला पिंपरी-चिंचवड शहर मुकले याची खंत या नागरिकांनी व्यक्त केली. आम्ही विकासासोबतच असून, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून झालेल्या कामांनाच आम्ही मतदान करणार असल्याचा शब्द नागरिकांनी दिला.

भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी पिंपळेगुरव परिसर पिंजून काढला. त्यांनी प्रत्येक भागात जाऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये अनेक नागरिक सहभागी झाले. यावेळी माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंगोळकर, रमेश काशीदआशिष जाधवकल्पतरू सोसायटीचे चेअरमन हेगडेराहुल जवळकरअमर आदियालमहेश जगतापशंकर ज्ञानोबा जगतापनरेश जगतापसुनील कांबळेराजू कांबळे यांच्यासह भाजप व मित्रपक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


पिंपरी : नक्राश्रू ढाळून पोटनिवडणूक बिनविरोध न करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवणार; पिंपळेगुरव आणि पिंपळेनिलखमधील जनतेचा सूर पिंपरी : नक्राश्रू ढाळून पोटनिवडणूक बिनविरोध न करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवणार; पिंपळेगुरव आणि पिंपळेनिलखमधील जनतेचा सूर Reviewed by ANN news network on २/२२/२०२३ ०६:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".