मंदार आपटे
खेड : शहरातील सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलची इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. धनश्री अभिजीत लंबाडे ही रत्नागिरी जिल्हयात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेल ३५वी आली आहे. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल खेड. दापोली- मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी तिचा सत्कार करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
आमदार कदम यांच्या वाढदिवसानिमित्त गोळीबार मैदान येथे ' राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाआयोजित करण्यात आल्या आहेत. याच व्यासपीठावर धनश्री लंबाडे हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिचे आईवडील, बहीण, तसेच सुनील दरेकर, शशिकांत चव्हाण, कुंदन सातपुते, डॉ. उपेंद्र तलाठी, किरण डफळे, राजेश बुटाला आदी उपस्थित होते.
कोकण :आमदार योगेश कदम यांच्या हस्ते धनश्री लंबाडे हिचा सत्कार
Reviewed by ANN news network
on
२/२१/२०२३ ०४:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: