तीन रुग्णांवर रोबोटद्वारे गुडघे व खुब्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वी
पिंपरी : डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल व संशोधन केंद्र पिंपरी पुणे येथील अस्थिरोग विभागामध्ये पहिल्यांदाच रोबोटिक द्वारे तीन रुग्णांवर कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या.
यामध्ये ५३ वर्षीय महिला व ३७ वर्षीय पुरुष या दोन्ही रुग्णांना उजव्या बाजूच्या खुब्याची तर ४६ वर्षीय पुरुष रुग्णाच्या उजव्या बाजूच्या गुडघ्याची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली या तिन्ही शस्त्रक्रियेसाठी दोन तासांचा कालावधी लागला. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सी टी स्कॅन द्वारे रुग्णाचे सांधेरोपणाचे नियोजन केले होते व रुग्णांना योग्य मूल्यमापनात्मक उपचार दिले गेले त्याकरिता गुडघे, खुबा, उपचाराच्या प्रक्रियेत रोबोटिक आर्म या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या तीन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या त्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांनी परीश्रम घेतले.
या तिन्ही रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी डॉ.राहुल साळुंखे, डॉ सुहास मासिलमणी, डॉ अंतेश्वर बिराजदार, डॉ. जे बी एस किशोर, डॉ दत्तात्रय भोकरे, भूल तज्ज्ञ डॉ. अपर्णा बागले यांचा प्रमुख सहभाग होता.
या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील, प्र कुलपती डॉ भाग्यश्री ताई पाटील, विश्वस्त व खजिनदार डॉ यशराज पाटील यांनी सर्व डॉक्टर्स टीमचे कौतुक केले आहे.
"अद्यावत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करत जागतिक दर्जाच्या सेवा देत असून अस्थिरोग संदर्भातील रुग्णांना या रोबोटिक सर्जरीचा फायदाच होईल या शस्त्रक्रियेसाठी कुशल सर्जन, आरोग्य सेवेतील मनुष्यबळ आदी द्वारे रुग्णसेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत" असे मत विश्वस्त व खजिनदार डॉ यशराज पाटील यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: