अधिकाऱ्यामध्ये दडलेला संवेदनशील स्तंभलेखक



अधिकारी आणि संवेदनशीलता यांचे फारसे जवळचे नाते नसते असे अनेकदा दिसून येते.  संवेदनशीलता जपली तर  कठोरपणे निर्णयांची अंमलबजावणी करता येत नाही. त्यामुळे अधिकारीही कित्येकदा रुक्ष, कर्तव्यकठोर माणूसघाणे असताना दिसतात.

 मात्र याला अपवाद नुकताच  नजरेस आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेसारख्या यंत्रणेत असाच एक अधिकारी दडलेला असेल याची सुतराम कल्पनाही नव्हती. एक दिवस महत्त्वाची एक बातमी सहज म्हणून मी त्या अधिकाऱ्याला पाठविली.त्यानंतर पाचच मिनिटात त्यांनीही मला एक लिंक पाठवली.

उघडून पाहतो तो काय, सर्वाना कळेल अशा साध्या सोप्या इंग्रजीत काहीसे ललिताकडे झुकणारे, तर काही सद्यस्थितीवर भाष्य करणारे लेखन त्या ब्लॉगवर होते.

 पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर के अनिल रॉय हे त्या लेखकाचे नाव. सध्या त्यांच्याकडे आरोग्य अर्थात शहरातील कचरा, सांडपाणी वगैरे रुक्ष आणि संवेदनशीलतेपासून पूर्णपणे फारकत घेणारे विषय आहेत.
 अशा स्थितीतही हा मनुष्य आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर भाष्य करण्या इतकी संवेदनशीलता जपतो हे पाहून  आश्चर्य वाटले. https://kanilroyspeaks.in हा त्यांचा ब्लॉग वाचनीय आहे. 

लवकरच डॉ. रॉय सेवानिवृत्त होणार असल्याचे नुकतेच समजले. निवृत्तीनंतर त्यांनी हा छंद अधिक तन्मयतेने जोपासावा. त्यामुळे  वाचकांना चांगला स्तंभलेखक मिळण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे सध्याचे आयुक्त देखील साहित्याशी जवळीक राखून आहेत. त्यांनी डॉ. रॉय यांच्या या लेखनाची दखल घ्यायला हरकत नाही.
अधिकाऱ्यामध्ये दडलेला संवेदनशील स्तंभलेखक अधिकाऱ्यामध्ये दडलेला संवेदनशील स्तंभलेखक Reviewed by ANN news network on ११/२७/२०२१ ०९:१७:०० PM Rating: 5

४ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".