महाराष्ट्र आणि कर्नाटक निवडणूक आयोगाकडून आरोपांचे खंडन, पुरावे देण्याची मागणी
नवी दिल्ली, (प्रतिनिधी): काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर मतदार याद्यांमध्ये 'घोळ' करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला.
राहुल गांधी म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारांची संख्या मुद्दाम वाढवण्यात आली, त्यामुळे विधानसभेत बनावट मतदान झाले." त्यांनी एक कोटी नवे मतदार वाढवण्यात आल्याचा दावा केला. तसेच, कर्नाटकातही बोगस मतदार असल्याचं त्यांनी म्हटलं.
त्यांनी आरोप केला की, निवडणूक आयोगाकडून वारंवार मागणी करूनही आम्हाला मतदार यादी किंवा डिजिटल आकडेवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कागदावरच्या आकडेवारीतून हा घोळ जनतेसमोर मांडावा लागत आहे.
या आरोपांनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक निवडणूक आयोगाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आयोगाने म्हटले आहे की, जर त्यांच्याकडे असे पुरावे असतील, तर त्यांनी ते प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावेत.
Rahul Gandhi
Election Commission
Voter List Fraud
Maharashtra Elections
Karnataka Elections
#RahulGandhi #ElectionCommission #VoterFraud #Maharashtra #Karnataka #IndianPolitics #FakeVoters

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: