ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही - मुख्यमंत्री
गोवा, (प्रतिनिधी): सगळ्या समाजाच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणाचेही कल्याण करताना मतांच्या राजकारणाकडे बघत नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. गोव्यातील 'ओबीसी महासंघा'च्या दहाव्या अधिवेशनात ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ओबीसी समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय 'विकसित भारत'चे स्वप्न पूर्ण होणार नाही." त्यांनी ओबीसी चळवळ आणि महासंघाशी २५ वर्षांचा संबंध असल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री झाल्यावर ओबीसी समाजाच्या हिताचे ५० निर्णय घेतल्याचे सांगितले.
यापुढेही ओबीसी समाजाच्या मागण्या केंद्र आणि राज्य सरकारमार्फत पूर्ण केल्या जातील आणि त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यांनी सांगितले की, ओबीसी समाजासाठी बोललो म्हणून माझ्यावर टोकाची टीका झाली, पण कितीही कोणीही लक्ष्य केले तरी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढत राहणारच.
या अधिवेशनाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्यासह ओबीसी समाजाचे अनेक नेते उपस्थित होते.
Devendra Fadnavis
OBC Sammelan
Political Statement
Goa Event
OBC Welfare
#DevendraFadnavis #OBC #Goa #MaharashtraPolitics #SocialWelfare #DevelopedIndia

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: