रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मराठी साहित्य संमेलनाचे २० व २१ डिसेंबर रोजी पुण्यात आयोजन
मराठी वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी संमेलनाचे आयोजन; अनेक नामवंत साहित्यिकांची उपस्थिती
३५ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आणि १४० हून अधिक पुस्तके लिहिणाऱ्या साहित्यिकाचा गौरव
पुणे, (प्रतिनिधी): रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, गीतकार आणि लेखक प्रा. प्रवीण दवणे यांची निवड करण्यात आली आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे आणि संमेलन प्रमुख मधुमिता बर्वे यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. संमेलनाचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून, याचे आयोजन २० आणि २१ डिसेंबर २०२५ रोजी कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले आहे.
प्रा. प्रवीण दवणे यांनी गेल्या ३५ वर्षांपासून मराठी विषयाचे अध्यापन केले असून, त्यांची कविता, गीत, ललित गद्य, कथा आणि कादंबरी अशा विविध साहित्यकृतींना वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. आजवर त्यांची १४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांच्या अनेक साहित्यकृतींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
आजच्या संगणक युगात मराठी वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, या उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. या संमेलनात विविध नामवंत साहित्यिक, कवी, विचारवंत आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत.
Pravin Dawane
Marathi Literature
Sahitya Sammelan
Rotary Club
Pune
#PravinDawane #MarathiSahitya #Pune #RotaryClub #MarathiLiterature
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: