'ऑपरेशन सिंदूर' च्या यशाबद्दल भारतीय लष्कराचा गौरव, भाजप साजरा करणार 'विजयोत्सव' : शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे

 


पिंपरी-चिंचवडमधून भारतीय लष्करासाठी  १ लाख ४५ हजार राख्या पाठवण्याचा भाजपचा संकल्प

पिंपरी-चिंचवड, दि. ६ ऑगस्ट २०२५: भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यालयात आज झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत यंदाचा स्वातंत्र्यदिन 'ऑपरेशन सिंदूर' च्या यशाचा 'विजयोत्सव' म्हणून साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. यासोबतच शहरातून १ लाख ४५ हजार राख्या पाठवण्याचाही संकल्प करण्यात आला आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वाखाली 'ऑपरेशन सिंदूर' पूर्णपणे यशस्वी झाले आहे आणि दहशतवादी शक्तींना धडा शिकवल्याबद्दल भारतीय लष्कराचा गौरव करण्यासाठी हा 'विजयोत्सव' साजरा केला जाईल. पंतप्रधान मोदींनी संसदेत दिलेल्या भाषणाचा संदर्भ देत, हा विजयोत्सव साजरा करणे प्रत्येक देशभक्त नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले.

या बैठकीत 'हर घर तिरंगा' अभियानावर विशेष भर देण्यात आला. या अभियानांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जाईल. यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती केली जाणार असून, लहान मुलांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यावर भर दिला जाईल. त्याचप्रमाणे, 'रक्षाबंधन' कार्यक्रमांतर्गत शहरातून १ लाख ४५ हजार राख्या भारतीय लष्करासाठी पाठवण्यात येणार आहेत, अशी माहितीही काटे यांनी दिली. हा कार्यक्रम सामाजिक सलोखा आणि बंधुत्व वाढवणारा असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

याशिवाय, स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजप पिंपरी-चिंचवडतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्षाबंधन उत्सव, तिरंगा यात्रा, स्वातंत्र्य सैनिक स्मारक स्वच्छता अभियान आणि १४ ऑगस्ट रोजी अखंड भारताचे स्मरण करण्यासाठी 'विभाजन विभीषिका दिन' साजरा करण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक मंडळात 'हर घर तिरंगा' यात्रा काढण्यात येणार असून, नागरिकांना तिरंग्याचे वाटप केले जाईल. तसेच, स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मारकांची स्वच्छता मोहिम संपूर्ण शहरात राबवण्यात येणार आहे.

या बैठकीला शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, पाटील बुवा चिंचवडे, विजय शिंदे, शैला मोळक यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन मोरेश्वर शेडगे यांनी केले.

Pimpri Chinchwad, BJP, Independence Day, Operation Sindur, Har Ghar Tiranga, Rakshabandhan.

 #PimpriChinchwad #BJP #IndependenceDay #OperationSindur #Vijayotsav #HarGharTiranga #Rakshabandhan

'ऑपरेशन सिंदूर' च्या यशाबद्दल भारतीय लष्कराचा गौरव, भाजप साजरा करणार 'विजयोत्सव' : शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे 'ऑपरेशन सिंदूर' च्या यशाबद्दल भारतीय लष्कराचा गौरव, भाजप साजरा करणार 'विजयोत्सव' : शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे Reviewed by ANN news network on ८/०६/२०२५ ०८:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".