मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'लाडक्या बहिणीं'कडून एक हजारहून अधिक राख्या
पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी मतदारसंघात रक्षाबंधनाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने पिंपरी-चिंचवडच्या तीनशेहून अधिक महिलांनी आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना राख्या बांधल्या.
या कार्यक्रमात महिलांनी आमदार गोरखे यांना राखी बांधण्याबरोबरच एक अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बंद लिफाफ्यातून एक हजारहून अधिक राख्या पाठवल्या. या राख्यांमधून महिलांनी मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल आभार व्यक्त केले.
महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना सांगितले की, 'लाडकी बहीण' यांसारख्या योजनांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. तसेच, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींमध्येही त्यांना समान संधी मिळत आहेत.
याप्रसंगी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, "महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता ही माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाची राहिली आहे आणि ते माझे कर्तव्य देखील आहे." त्यांनी 'आपला भाऊ' म्हणून नेहमीच उपलब्ध राहण्याचे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.
Raksha Bandhan
MLA Amit Gorkhe
Pimpri Chinchwad
Devendra Fadnavis
Women Empowerment
#RakshaBandhan #Pimpri #AmitGorkhe #DevendraFadnavis #WomenEmpowerment #Maharashtra #PimpriChinchwad

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: